scorecardresearch

पुणे: हडपसरमधून बेपत्ता झालेल्या तरुणाचा बोपदेव घाटात खून

हडपसर भागातून दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुण बोपदेव घाटात मृतावस्थेत सापडला.

पुणे: हडपसरमधून बेपत्ता झालेल्या तरुणाचा बोपदेव घाटात खून
प्रातिनिधिक छायाचित्र /लोकसत्ता

हडपसर भागातून दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुण बोपदेव घाटात मृतावस्थेत सापडला. तरुणाचा गोळी झाडून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.गणेश मुळे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश रविवारी (११ डिसेंबर) घरातून बेपत्ता झाला. तो बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

दरम्यान, कोंढवा परिसरातील बोपदेव घाटात सोमवारी रात्री गणेशचा मृतदेह सापडला. त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याचे उघडकीस आले. खुनामागचे कारण समजू शकले नाही. हडपसर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-12-2022 at 10:33 IST

संबंधित बातम्या