पुणे : कर्वेनगर येथील नवसह्याद्री सोसायटीच्या जवळ क्रीडांगणाचे आरक्षण असलेली जागा पुणे महापालिकेने तातडीने ताब्यात घ्यावी, अशी मागणी ‘आपले पुणे’ संस्थेने केली आहे. ‘महापालिकेने ही जागा ताब्यात घेऊन येथे क्रीडांगण विकसित केले, तर काेथरूड भागातील युवकांना चांगली सुविधा उपलब्ध हाेईल,’ असे संस्थेचे उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, प्रशांंत बधे यांनी सांगितले. संस्थेच्या वतीने याबाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन देण्यात आले असून, त्यामध्ये ही मागणी करण्यात आली आहे.

महापालिकेच्या विकास आराखड्यात (डीपी) व सह्याद्री शैलेश सोसायटीच्या लगत एका क्रीडांगणाचे आरक्षण आहे. ही आरक्षणाची जागा एका बांधकाम व्यावसायिकाने विकत घेतली आहे. या जागेभोवती पत्र्याचे कंपाउंड टाकले आहे. मात्र, या बांधकाम व्यावसायिकाकडे याची कागदपत्रे उपलब्ध नाहीत, असे आयुक्तांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘ही जागा सुमारे चार एकर असून, ती ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने कलम चार आणि सहा याचा वापर करावा. भूसंपादन अधिकाऱ्याकडे पैसे भरून पंचनामा करून हा भूखंड ताब्यात घ्यावा. यासाठी स्वतंत्र बैठक घेणे आवश्यक आहे. महापालिकेने यापूर्वी शहीद मेजर प्रदीप ताथवडे उद्यानाची जागादेखील एका माेठ्या बांधकाम व्यावसायिकाकडून पैसे भरून ताब्यात घेतली हाेती. त्याच पद्धतीने पावले उचलून ही जागा ताब्यात घ्यावी,’ अशी मागणी ‘आपले पुणे’च्या वतीने करण्यात आली आहे.