पुणे: अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश करणारे अधिकारी तसेच वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाचे माजी अधीक्षक अब्दुल जलील शेख यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटामध्ये प्रवेश केला आहे. त्यांची पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशाने अब्दुल जलील शेख यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अयुब शेख यांनी मंगळवारी पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिले. सरचिटणीस खाजाभाई शेख व प्रमुख पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ‘बेईमान’ नाटकाचे उद्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण; नव्या संचात नाटकाचे प्रायोगिक रंगभूमीवर प्रयोग

हेही वाचा >>> पुरंदर विमानतळाच्या विरोधावर कौशल्य विकासाची ‘मात्रा’; प्रकल्पग्रस्तांना भविष्यातील रोजगारांत सामावून घेण्यासाठी वयोगटानुसार विश्लेषण सुरू

जलील हे मुंबई येथे नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) मध्ये अनेक आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीच्या प्रकरणांचा पर्दाफाश करण्यात आघाडीवर होते. त्यांनी महसूल, गुप्तचर संचालनालयामध्येही यशस्वीरीत्या काम पाहिले आहे. रत्नागिरी येथे सीमा शुल्क विभागातही ते काही वर्षे कार्यरत होते. रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय कार्यास सुरुवात करीत आहे. विविध विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांना आणून पक्षाची ताकद वाढवणार असल्याचे शेख यांनी या वेळी सांगितले. सरचिटणीस खाजाभाई शेख व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accession administrative official to the republican party election regional vice president pune print news ysh
First published on: 02-11-2022 at 14:51 IST