पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीनाच्या रक्ताच्या नमुन्यात बदल केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर शरण आलेला आरोपी अरुणकुमार सिंग याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश शुक्रवारी न्यायालयाने दिले. रक्ताचे नमुने बदलण्यासाठी ससूनमधील डाॅक्टरांना सिंग याने किती रक्कम दिली, तसेच त्याच्या बँक खात्याची माहिती घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांनी सिंग याला १४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश

कल्याणीनगर अपघात प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या मोटारचालक मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. मोटारीतील मागील आसनावर असलेल्या दोन मुलांच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी आरोपी अरुणकुमार देवनाथ सिंग (वय ४७, रा. विमाननगर) याने आशिष मित्तल आणि ससूनमधील डॉ. श्रीहरी हाळनोर आणि डाॅ. अजय तावरे यांना पैसे दिले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सिंग पसार झाला. त्याचा मुंबई उच्च न्यायालय, तसेच सर्वोच्च न्यायालायने अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. त्यानंतर तो शरण आला. पोलिसांनी त्याला अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर केले.आरोपी सिंगने ससूनमधील डाॅक्टरांना रक्त नमुन्यात बदल करण्यासाठी किती रक्कम दिली, तसेच त्याच्या बँक खात्याची माहिती घ्यायची आहे. तपासासाठी पोलीस कोठडी देण्याची विनंती विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी यु्क्तिवादात केली.

हेही वाचा >>>नोकरीच्या आमिषाने कुंटणखान्यात पाच तरुणींची विक्री, गुन्हे शाखेकडून तरुणींची सुटका

कल्याणीनगर अपघात प्रकरणात अगरवालचा मुलगा आणि त्याच्याबरोबर असलेल्या दोन मित्रांनी मुंढव्यातील एका पबमध्ये मद्यप्राशन केले होते. अपघातानंतर पोलिसांनी त्यांना तपासणीसाठी ससून रुग्णालयात आणले. तेव्हा अगरवाल, त्याची पत्नी शिवानी, अरुणकुमार सिंग यांनी संगनमत करुन डाॅक्टरांना रक्ताच्या नमुन्या बदल करण्यासाठी पैसे दिल्याचे तपासात उघडकीस आले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर सिंग कोठे वास्तव्यास होता, तसेच त्याला कोणी मदत केली, यादृष्टीने तपास करायचा असल्याने पोलीस कोठडी देण्याची विनंती तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे आणि ॲड. शिशिर हिरे यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बचाव पक्षातर्फे ॲड. अबिद मुलाणी आणि ॲड. सारथी पानसरे यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांनी सिंग याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.