पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरण, तसेच अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणाचा तपास करणारे गुन्हे शाखेतील सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांचे विशेष शाखेत बदली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तांबे यांच्या जागी सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश दिले.

हेही वाचा…पिंपरीतील १५ रस्त्यांच्या कामांचा दर्जा निकृष्ट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कबुली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुनील तांबे यांची गेल्या वर्षी तीन जुलै रोजी गुन्हे शाखेत सहायक पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. ललित पाटील प्रकरण, शरद मोहोळ खून प्रकरण, कुरकुंभ अमली पदार्थ तस्करी प्रकरण, बहुचर्चित कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा तपास तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला होता. पुढील महिन्यात तांबे निवृत्त होणार आहेत. निवृत्तीपूर्वी तांबे यांची बदली गुन्हे शाखेतून विशेष शाखेत करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.