दहशत माजविणाऱ्या स्वप्नील किसन भालेकर (वय २७) या आणखी एका सराईत गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एमपीडीएनुसार कारवाई केली आहे. त्याला एक वर्षांसाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांची ही ७४ वी कारवाई ठरली आहे.

सविस्तर वाचा – पुणे : लग्नाचे आमिष दाखवून पोलिसाचेच अत्याचार

स्वप्नील हा सराईत गुन्हेगार आहे. विमानतळ, येरवडा, विश्रांतवाडी या परिसरात त्याने दहशत पसरवली असून, त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारी कृत्ये सुरूच असल्याने त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ट निरीक्षक भरत जाधव यांनी परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांच्यामार्फत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार अमिताभ गुप्ता यांनी ही कारवाई केली.