पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी पुणे शहरातील कोरेगाव पार्क येथील 1800 कोटींची जमीन 300 कोटींना पार्थ पवार यांनी खरेदी केल्याची माहिती समोर आली.या जमीन खरेदी व्यवहार प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री,अर्थमंत्री पदाचा राजीनामा द्यावा,अशी मागणी विरोधी पक्षातील नेत्यांनी केली.त्या सर्व घडामोडी दरम्यान दोन अधिकारी निलंबित केले.तर या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पण या जमीन खरेदी व्यवहार प्रकरणातील नोंदीमध्ये अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचे नाव असून देखील पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही.त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. त्या सर्व घडामोडी दरम्यान मुंढवा येथील ज्या शासकीय जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार झाला.त्या ठिकाणी विविध संघटनांनी रास्ता रोको करीत आमच्या जमिनी अजित पवार यांनी आम्हाला परत द्याव्यात, पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्यात यावी,अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली.