लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : मुले होताना देवाची, अल्लाहाची काही कृपा नसते. नवऱ्याची कृपा असती म्हणून मुले होतात. लहान कुटुंब ठेवले तर योजनांचा फायदा होईल. मुलांना चांगले शिक्षण देऊ शकाल. स्वत:चे जीवन चांगल्या पद्धतीने जगता येईल. त्यामुळे सर्वांनी दोन मुलांवर थांबावे, असे आवाहन उपमुख्यंमत्री अजित पवार यांनी केले.

तळेगाव दाभाडे येथील जनसंवाद सभेत बोलताना पवार म्हणाले, अलीकडे गुप्तचार विभागाने मला एक निरोप पाठविला की माझ्या जीवाला धोका आहे. परंतु, मी महाराष्ट्रात फिरणार, जीवाला धोका आहे की नाही याचा मी विचार करत नाही. पोलिसांनी त्याची काळजी घ्यावी. महाराष्ट्रातील बहिणींनी बांधलेल्या राख्यांनी जे काही संरक्षण दिले आहे. हे राखीचे सुरक्षाकवच आणि प्रेमाची ढाल कोणताही धोका मला स्पर्श करु शकत नाही. कारण, आम्ही कोणाचे वाईट केले नाही. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न डोळ्यासमोर ठेऊन काम केले. सरकारमध्ये असल्याने गोरगरिबांच्या मुलांना मोफत शिक्षण देऊ शकलो.

आणखी वाचा-पुणे : शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या सुरक्षारक्षकाविरुद्ध गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

…म्हणून मला गुलाबी रंग आवडतो

गुलाबी रंग महिलांना आवडतो म्हणून मलाही आवडायला लागला. यात चुकीचे काय आहे. आम्ही वेडे वाकडे तर करत नाही ना? महिला लग्नात देखील इतक्या सुंदर दिसत नव्हत्या. इतक्या फेट्यात दिसत आहेत. नवरे देखील ओळखायचे नाहीत. फेटा घरी जाईपर्यंत काढू नका, फेटा घातल्यावर कोण कसा दिसतो, हे नवऱ्याला विचारा असेही ते म्हणाले.