पक्षाने आदेश दिल्यास पुणे लोकसभेची निवडणूक लढवण्याचे संकेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी गुरुवारी दिले. येत्या काळात प्रत्येक विद्यापीठाच्या अधिसभेची निवडणूक मनविसे लढवणार असून, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यास सर्वाधिक प्राधान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे एक पाऊल मागे म्हणाले, शिरूरची जागा भाजप किंवा राष्ट्रवादीला…’

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत मनविसेतर्फे ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. मनविसेचे गजानन काळे, प्रशांत कनोजिया, मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर उपस्थित होते. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना चांगले जेवण मिळत नाही. विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुरेसे वसतिगृह नाहीत. मराठी भाषा भवनाचे काम अपूर्ण आहे.

हेही वाचा >>> तुम्ही खात असलेला पदार्थ खरोखरच शाकाहारी आहे का ? केंद्र सरकार करणार कायद्यात सुधारणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आणि मागण्या प्रलंबित असल्याने मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये मोर्चा काढला जाणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.  बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने परीक्षा सुरू झाल्यानंतर मोर्चा सुरू केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. मोर्चा शांततापूर्ण वातावरणात होईल. वाहतूक कोंडी होणार नाही याचीही काळजी घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी कार्यकर्ते सक्रिय राहणार असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले. पुणे लोकसभा निवडणुकीसाठी मनसेकडून वसंत मोरे आणि शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्याबाबत असलेल्या चर्चेबाबत ठाकरे म्हणाले की, ‘राजसाहेबांनी आदेश दिल्यास पुणे लोकसभेसोबतच राज्यात कुठेही लढण्याची तयारी आहे. मात्र, स्वत:हून निवडणूक लढवण्याबाबत अद्याप विचार केलेला नाही.