राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा आणि अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी ग्रंथालयांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट  ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीस योगदान देणाऱ्या सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातील कार्यकर्ता व सेवक यांना डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट  ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कार देण्यात येतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ, ब, क आणि ड वर्गातील  उत्कृष्ट  शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे ५० हजार रूपये, ३० हजार, वीस हजार, दहा हजार रुपये आणि  प्रमाणपत्र देऊ न गौरविण्यात येते.

राज्यस्तरीय प्रत्येकी एक उत्कृष्ट  कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये आणि प्रमाणपत्र तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभाग स्तरावर प्रत्येकी एक कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊ न गौरविण्यात येते.

सन २०१८-१९ च्या पुरस्कार योजनेत सहभागी होण्यासाठी ग्रंथालय, कार्यकर्ते व सेवक यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज व प्रस्ताव २८ सप्टेंबरपर्यंत तीन प्रतींमध्ये जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन पुणे विभागीय सहायक ग्रंथालय संचालक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Appeal to apply for best library award
First published on: 01-09-2018 at 02:35 IST