लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवादाचा परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम सोमवारी (२९ जानेवारी) होणार आहे. या कार्यक्रमाचे विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठीची सुविधा शाळांमध्ये उपलब्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहे. दूरचित्रवाणीची व्यवस्था नसल्यास रेडिओ उपलब्ध करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.

शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी या बाबतच्या सूचना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. गेली काही वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधतात. यंदा या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालकांची अधिकाधिक नोंदणी करण्याचे आदेश केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून राज्याच्या शिक्षण विभागाला देण्यात आले होते. त्यामुळे या नोंदणीसाठी शिक्षण विभागाची धावाधाव झाली होती.

आणखी वाचा-भारतीय शास्त्रज्ञांची मोठी कामगिरी; कृष्णविवराजवळून उत्सर्जित होणाऱ्या क्ष किरण रहस्याचा केला उलगडा

या पार्श्वभूमीवर आता हा कार्यक्रम सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठी शाळांमध्ये मोठ्या पडद्याची व्यवस्था, दूरचित्रवाणी उपलब्ध करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची छायाचित्रे माय गव्हर्न्मेंट या संकेतस्थळावर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सार्जजनिक ठिकाणी सेल्फी पॉईंटही…

परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नवी मुंबई, कोल्हापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक या शहरांमध्ये बसस्थानक, रेल्वे स्थानक, मेट्रो स्थानक पोस्ट ऑफिस अशा सार्वजनिक ठिकाणी सेल्फी पॉईंट तयार करावे, विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी सेल्फी घ्यावेत, तो सेल्फी केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर अपलोड करावा अशा सूचना राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण (एससीईआरटी) परिषदेचे संचालक अमोल येडगे यांनी दिले आहेत.