कोंढवा परिसरात एका सदनिकेचे कुलूप तोडून ३७ लाख ३० हजार रुपयांचे दागिने लांबविल्या प्रकरणी गुन्हे शाखेने चोरट्याला अटक केली. नवीन घर खरेदी करण्यासाठी चोरट्याने घरफोडी केल्याचे तपासात उघडकीस आले असून त्याच्याकडून ३७ लाख ३० हजार २०० रुपयांचे ६५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे. मल्लप्पा साहेबाना होसमानी (वय ३१, रा. आंबेगाव बुद्रुक), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा- ‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकलेच्या मोटारीला अपघात, डोक्याला दुखापत

कोंढवा भागात नाताळ सण साजरा करण्यासाठी बाहेर पडलेल्या एका कुटुंबाच्या सदनिकेतून ३७ लाख ३० हजार रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत होता. पोलिसांनी सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले होते. चोरटा दुचाकीवरुन पसार झाल्याचे तपासात उघडकीस आले होते. दुचाकीवर एक स्टीकर लावण्यात आले होते. पोलिसांनी चौकशी सुरु केली. चौकशीत स्टीकर लावलेली दुचाकी सराईत चोरटा होसमानी वापरत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सापळा लावून त्याला पकडले.

हेही वाचा- ‘टोमणे मारण्याऐवजी तोंड बंद ठेवावे’; चंद्रशेखर बावनकुळे यांची संजय राऊत यांच्यावर टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवीन घर खरेदी करण्यासाठी त्याने घरफोडी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक कृष्णा बाबर, अविनाश लोहोटे, चैत्राली गपाट, राजस शेख, रमेश साबळे आदींनी ही कारवाई केली.