पुणे: जगात सर्वाधिक वापरला जाणारा कृत्रिम स्वीटनर ॲस्पारटेम हा कर्करोगाला कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) यावर शुक्रवारी शिक्कामोर्तब केले. दिवसाला व्यक्तीला त्याच्या प्रतिकिलो वजनामागे ४० मिलिग्रॅम एवढ्या प्रमाणातच ॲस्पारटेमचे सेवन स्वीकारार्ह असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.

जगभरात १९८० पासून शीतपेये आणि खाद्यपदार्थांमध्ये ॲस्पारटेम या कृत्रिम स्वीटनरचा वापर केला जातो. त्यात डाएट ड्रिंक्स, च्युईंग गम, जिलेटिन, आईस्क्रीम, दुग्ध उत्पादने, टूथपेस्ट आणि खोकल्याची औषधे व व्हिटॅमिनच्या गोळ्यांचा समावेश आहे. जागतिक आरोग्य संघटना, ‘इंटरनॅशनल एजन्सी ऑफ रिसर्च ऑन कॅन्सर’ (आयएआरसी) आणि जॉइंट एक्स्पर्ट कमिटी ऑन फूड ॲडिटिव्ह्ज (जेईसीएफए) यांनी ॲस्पारटेम हा मानवासाठी कर्करोगाला कारणीभूत ठरू शकतो, अशी घोषणा शुक्रवारी केली. मर्यादित पुराव्यांच्या आधारे अस्पारटेम कर्करोगाला घातक असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

आणखी वाचा-मनमोहक! पुण्यातील रिव्हर्स धबधब्यानं घेतलं सर्वांचं लक्ष वेधून

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत जागतिक आरोग्य संघटनेतील तज्ज्ञ डॉ. फान्सेस्को ब्रांका म्हणाले, की जागतिक पातळीवर सर्वाधिक मृत्यू होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांमध्ये कर्करोग आहे. दर वर्षी सरासरी सहापैकी एका व्यक्तीचा कर्करोगाने मृत्यू होता. कर्करोगाला कारणीभूत असणारे घटक शोधण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करीत आहेत. त्यामुळे कर्करोगामुळे होणारे मृत्यू कमी होण्यास मदत होईल.

कृत्रिम स्वीटनरचा वापर मधुमेही आणि वजन कमी करणाऱ्या व्यक्ती करतात. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे कर्करोग होतात. कृत्रिम स्वीटनरचा धोका समोर आल्याने ते पूर्णपणे वर्ज्य करावेत. कृत्रिम स्वीटनर टाळून योग्य आहार आणि व्यायामावर भर द्यावा. -डॉ. अविनाश भोंडवे, आरोग्यतज्ज्ञ