पुणे : लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून पुणे जिल्ह्यातील ५० टक्के गावे लाल श्रेणीत आली आहेत. शासकीय डॉक्टरांच्या पथकाकडून गावोगाव लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र, रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे खासगी पशुधन पर्यवेक्षक तसेच डॉक्टरांच्या मदतीने लसीकरणाला अधिक गती देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने खासगी पशुसंवर्धन पदवीधारकांना या कठीण परिस्थितीत लसीकरणाला मदत करण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा >>> Maharashtra Breaking News Live : दसरा मेळाव्यावरून शिंदे-ठाकरे गट आमने-सामने; राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…

हेही वाचा >>> पुणे जिल्ह्यात ५९ जणांना नव्याने करोना संसर्ग

जिल्ह्यामध्ये सध्या ६०३ जनावरांना लम्पीची लागण झाली असून त्यापैकी २४ जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आठ लाख जनावरे आहेत. त्या तुलनेत लसीकरणासाठीची पदसंख्या अपुरी आहे. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी विशेष बाब म्हणून ३२ नवीन पशुधन पर्यवेक्षकांना कंत्राटी पद्धतीने कामावर घेण्यास परवानगी दिली आहे. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी खासगी पशुवैद्यकीय अधिकारी, अन्य कर्मचाऱ्यांना लसीकरण कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांना सरकारी दवाखान्यांतून मोफत लस उपलब्ध होणार आहे. तसेच संबंधितांना प्रत्येकी तीन रुपये लसटोचणी म्हणून मानधन देण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात सध्या खासगी ९५० पशुधन पर्यवक्षेक, तर ४५० खासगी डॉक्टर आहेत.

हेही वाचा >>> ‘ते’ दोघेही चर्चांमध्ये फारसा वेळ घालवत नाहीत, म्हणूनच तर… – सुप्रिया सुळे

जिल्ह्यातील लम्पी लसीकरण

जिल्ह्यातील एकूण पशुधन – आठ लाख

बाधित जनावरे ६०३

मृत्यू – २४

एकूण प्राप्त लस – चार लाख

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

झालेले लसीकरण – दोन लाख २३ हजार