थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचं पुण्यात वृद्धापकाळाने शुक्रवारी निधन झालं. त्या ८४ वर्षांच्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या त्या आत्या तर चित्रपट सेनेच्या पदाधिकारी कीर्ती फाटक यांच्या त्या मातोश्री होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजीवनी करंदीकर यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांनी आंतरजातीय विवाह केला होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ३८ वर्षे त्यांनी मशीन सेक्शन अधिकारी म्हणून काम केले होते.

संजीवनी करंदीकर यांच्या निधनाचं वृत्त समजल्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी फेसबुकवर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत संजीवनी करंदीकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारांसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे पुण्यात उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb thackeray sister sanjivani karandikar death in pune pmw
First published on: 13-05-2022 at 12:18 IST