सिंहगड किल्ल्यावर फिरायला गेलेल्या काही पर्यटकांनी कल्याण दरवाजाजवळ हुल्लडबाजी करून छायाचित्रे काढण्याचा प्रयत्न केला. आग्या मोहोळ असलेल्या झाडावरचे मोहोळ उठले आणि मधमाशांना हल्ला करुन २५पर्यटकांना दंश केला. या घटनेत तीन पर्यटक बेशुद्ध पडले. ११ पर्यटकांना उपचारासाठी खेड शिवापूर तसेच तीन पर्यटकांना धायरीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सिंहगडावरील कल्याण दरवाजा परिसरात झाडावर तसेच खडकाजवळ आठ ते नऊ मधमाशांची पोळी आहेत. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास तेथे तरुण-तरुणींचा गट तेथे आला. त्यांनी हुल्लडबाजी करुन छायाचित्रे काढण्यास सुरुवात केली. त्या वेळी झाडाची फांदी तुटली आणि मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. २५ पर्यटकांना मधमाशांनी दंश केला. त्या पैकी तीन ते चार जण बेशुद्ध पडले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि वनविभागातील कर्मचाऱ्यांचे पथक तेथे गेले. टेंभे पेटविण्यात आले. तसेच लाकूड, पालापाचोळा जाळण्यात आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर धूर झाला आणि तेथून मधमाश्या गेल्या.

Sharad Pawar group opposition to one country one election
शरद पवार गटाचा ‘एक देश एक निवडणूक’ला विरोध; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘शपथनामा’ प्रसिद्ध
elelction 38 applications filed in Maval for lok sabha election pune news
मावळमध्ये ३८ जणांचे अर्ज दाखल; ‘संजोग, वाघेरे’ नामसाधर्म्य असलेले दोन उमेदवार रिंगणात
man kidnapped and burnt to killed in gujarat over instagram status
पुणे: ‘म्हाळुंगे किंग’ पोस्ट जीवावर बेतली; अपहरण करून गुजरातमध्ये जाळून केली हत्या, वाचा सगळा घटनाक्रम
sharad pawar slams amit shah over knowledge about agriculture
‘अमित शहा यांचे शेतीसंबंधीचे ज्ञान मर्यादित’, शरद पवार यांचा टोला

ग्रामस्थांनी जखमी झालेल्या पर्यटकांना घोंगडीच्या झोळीतून सिंहगड पायथा परिसरात आणले. त्यानंतर त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती माऊली कोडितकर यांनी दिली. मधमाशांनी हल्ला केल्यानंतर वनविभागाने दुपारी तीनच्या सुमारास गडाकडे जाणारा रस्ता बंद केला. पर्यटकांना खाली उतरण्याचे आवाहन केले. रविवारची सुट्टी असल्याने गडावर पर्यटकांची गर्दी होती. तिथीनुसार साजरा करण्यात येणाऱ्या श्री शिवराज्यभिषेक दिनानिमित्त गडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ओंकार पढेर, भाऊ जोरकर, दत्ता जोरकर, संदीप कोळी, नंदू जोरकर, आकाश बांदल, राकेश पन्हाळकर आदी मदतकार्यात सहभागी झाले होते.

मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नऊ जणांवर उपचार करुन त्यांना सोडण्यात आले. – बाळासाहेब जिवडे, वनरक्षक, खानापूर