सिंहगड किल्ल्यावर फिरायला गेलेल्या काही पर्यटकांनी कल्याण दरवाजाजवळ हुल्लडबाजी करून छायाचित्रे काढण्याचा प्रयत्न केला. आग्या मोहोळ असलेल्या झाडावरचे मोहोळ उठले आणि मधमाशांना हल्ला करुन २५पर्यटकांना दंश केला. या घटनेत तीन पर्यटक बेशुद्ध पडले. ११ पर्यटकांना उपचारासाठी खेड शिवापूर तसेच तीन पर्यटकांना धायरीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिंहगडावरील कल्याण दरवाजा परिसरात झाडावर तसेच खडकाजवळ आठ ते नऊ मधमाशांची पोळी आहेत. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास तेथे तरुण-तरुणींचा गट तेथे आला. त्यांनी हुल्लडबाजी करुन छायाचित्रे काढण्यास सुरुवात केली. त्या वेळी झाडाची फांदी तुटली आणि मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. २५ पर्यटकांना मधमाशांनी दंश केला. त्या पैकी तीन ते चार जण बेशुद्ध पडले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि वनविभागातील कर्मचाऱ्यांचे पथक तेथे गेले. टेंभे पेटविण्यात आले. तसेच लाकूड, पालापाचोळा जाळण्यात आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर धूर झाला आणि तेथून मधमाश्या गेल्या.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bee attack on tourists at sinhagad fort print news asj
First published on: 12-06-2022 at 22:50 IST