दिवाळी सणाचा प्रत्येक दिवस आपण आपल्या कुटुंबातील व्यक्ती सोबत साजरा करीत असतो. पण आपल्यातील एक घटक सदैव आपल्या अडचणीच्या काळात पुढे असतो. तो म्हणजे अग्निशामक विभाग. याच विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत मागील तब्बल २७ वर्ष पुण्यातील भोई प्रतिष्ठान गंज पेठेतील अग्निशामक विभागाच्या मुख्य कार्यालय येथे अधिकारी,कर्मचारी वर्गासोबत भाऊबीज साजरी करत आहे. यंदा देखील दरवर्षी प्रमाणे त्याच उत्साहाच्या वातावरणात भाऊबीज साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास भोई प्रतिष्ठानचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद भोई,ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर,अभिनेत्री पूजा पवार,श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, मुख्य अग्निशामक अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते.

हेही वाचा : बाबा आम्हाला तुमचा अभिमान वाटतो’; ७१ वर्षीय नागपूरकर बाबा शेळकेंची भारत जोडोत १२०० किमीची पदयात्रा पूर्ण

या भाऊबीज कार्यक्रमास विविध क्षेत्रातील महिलांनी अग्निशामक विभागातील अधिकारी,कर्मचार्‍यांना ओवाळले. त्यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले. यावेळी अभिनेत्री पूजा पवार म्हणाल्या की, मी पहिल्यांदाच भोई प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहे. कार्यक्रमामध्ये आल्याने एक वेगळेच समाधान मिळाले असून आता मी दरवर्षी येणार आहे. तसेच आपल्या प्रत्येकाच्या अडचणीच्या काळात पोलिस आणि अग्निशामक विभागातील अधिकारी,कर्मचारी सदैव तत्पर असतात. त्यामुळे आपण यांच्या सोबत सण उत्सव साजरे केले पाहिजेत अशी भावना देखील त्यानी यावेळी व्यक्त केली. तसेच त्या पुढे म्हणल्या की, सध्या कुठे काही घटना घडली की,काही जण सेल्फी काढतात आणि सोशल मीडियावर पाठवत बसतात.मात्र त्यापेक्षा जवळील पोलिसांना किंवा अग्निशामक विभागाला फोन करून माहिती दिली पाहिजे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.