भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचं पुणे महापालिकेत जंगी स्वागत करण्यात आलं. तसेच पुणे महानगरपालिकेच्या ज्या पायरीवर त्यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाली, तिथेच भाजपाच्या वतीने सोमय्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपाचे सभागृह नेते गणेश बिडकर आणि नगरसेवक उपस्थित होते. यावेळी पालिकेबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

किरीट सोमय्या यांनी यावेळी भाषणही केलं. ते म्हणाले, “पुण्यातील कोविड सेंटरचा ठेका मिळालेल्या कंपनीचा मालक चहावाला आहे. तसेच हा चहावाला केईएम रुग्णालयामागे असतो. ठाकरे सरकारने पुण्याच्या लोकांच्या जीवाशी खेळ केला. संजय राऊत यांची ही बेनामी कंपनी आहे. पुणे महापालिकेने त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेत ४ ठेके दिले.”

हेही वाचा : शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या संचेती रुग्णालयात दाखल, डॉक्टर म्हणाले, “मानसिक धक्का बसल्याने…”

“उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या बेनामी कंपनी आहेत. त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही,” असंही सोमय्या यावेळी म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

किरीट सोमय्या शनिवारी (५ फेब्रुवारी) आधी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गेले. तिथे त्यांनी पुणे जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. यानंतर सोमय्या तेथून पुणे महानगरपालिकेत आयुक्तांना भेटण्यासाठी आले. त्यावेळी शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांना निवेदन स्विकारण्याची मागणी केली. मात्र, सोमय्यांनी हे निवेदन स्विकारलं नाही. यावर आक्रमक शिवसेना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली.

व्हिडीओ पाहा :

शिवसेना कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर पोलिसांनी किरीट सोमय्यांना घटनास्थळावरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसैनिकांच्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या पायऱ्यांवर पडले. यानंतर पोलिसांनी सोमय्या यांना तिथून बाजूला नेत गाडीत बसवले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी किरीट सोमय्या यांना गाडीत बसवल्यानंतरही आक्रमक शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवरही हल्ला चढवला. काही कार्यकर्ते गाडीच्या समोर आले, तर काही कार्यकर्त्यांनी गाडीच्या मागच्या बाजूने हल्ला केला.