हडपसर येथील भाजपचे नेते विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश सातबा वाघ यांचे फुरसुंगी फाटा येथून सोमवारी सकाळी पहाटेच्या सुमारास अपहरण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना,पुणे शहरापासून जवळपास ४५ किलो मीटर अंतर असलेल्या यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह आढळला आहे.

हेही वाचा >>> पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सोमवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास सतीश वाघ हे घरातून फिरायला बाहेर पडले होते. त्यावेळी मोटारीतून आलेल्या चार ते पाच जणांनी सतीश वाघ यांना धमकावून सासवडच्या रस्त्याने पसार झाले. तर एकाने ही घटना पाहिली आणि त्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली.या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पथके तयार करून विविध ठिकाणी रवाना करण्यात आली.मात्र पुण्यापासून ४५ किलोमीटर अंतरावरील यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह आढळून आला असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.तर या आरोपीचा शोध घेतला जात आहे.