बारामती : छत्रपती संभाजी महाराजांविरोधात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने बारामतीमध्ये अजित पवार यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तसेच मोर्चाही काढण्यात आला.

नक्की पाहा >>> Video: “अजित पवार साहेब, हे तुमचंच आहे ना?” ‘तो’ फोटो ट्वीट करत निलेश राणेंचा खोचक टोला!

Sanjay Mandlik on Shahu Maharaj Satej Patil
‘शाहू महाराज खरे वारसदार नाहीत’, महायुतीच्या संजय मंडलिक यांच्या विधानावर सतेज पाटील संतापले
Heena Gavit nandurbar
नंदुरबार – धुळ्यात भाजप उमेदवारांच्या विरोधात राष्ट्रवादीची नाराजी
vijay shivtare
निनावी पत्राद्वारे शिवतारेंच्या माघारीवर टीका; पवारांच्या विरोधातील ५ लाख ८० हजार मतदारांनी करायचे काय?
MP Sanjay Mandlik felicitated by NCP District President Babasaheb Patil Asurlekar
तर शाहू महाराजांना राज्यसभेवर का पाठवले नाही? संजय मंडलिक यांचा सवाल

छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात वादग्रस्त विधान केले होते. त्याविरोधात भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका स्वीकारली असून राज्यभर आंदोलने करण्यात येत आहेत. त्याचे पडसाद अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमध्येही उमटले. भाजप आणि मित्रपक्षांच्या वतीने बारामतीमध्ये मोर्चा काढत वादग्रस्त विधानाचा निषेध नोंदविण्यात आला. भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात संघटन सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामटे, बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे, रंजन तावरे, तानाजी थोरात, सुरेंद्र जेवरे, मारूती वनवे, देवेंद्र बनकर यांच्यासह अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. अजित पवार यांनी माफी मागावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.