जयेश सामंत-अविनाश कवठेकर

पुणे / ठाणे : प्रतिष्ठेच्या बनलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा विजय घडवून आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच व्यूहरचनेची सूत्रे हातात घेतली आहेत. एकीकडे भाजपचे अनेक मंत्री या मतदारसंघात तळ ठोकून मतदारांशी संपर्क साधत असताना शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातून माजी नगरसेवक-पदाधिकाऱ्यांची मोठी कुमक कसब्यात दाखल झाली आहे. या मतदारसंघातील जातीय समीकरणे जुळवण्यासाठी ब्राह्मण, सोनार, कासार समाजातील प्रभावी मंडळींनाही विशेष जबाबदारी देण्यात आली आहे.

Map , Akola district, human chain,
मानवी साखळीतून साकारला अकोला जिल्ह्याचा नकाशा
Lok Sabha Election 2024 Phase 1 Live Updates in Marathi
पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान; १९ राज्यांमधील १०२ मतदारसंघ सज्ज
bjp to defeat mamta banerjee in loksabha
ममतादीदींच्या तृणमूलचा पराभव करण्यासाठी भाजपाला ‘या’ जागा जिंकण्याची गरज; पश्चिम बंगालमध्ये पक्षाची स्थिती काय?
Andhasraddha Nirmulan Samiti
अर्ज भरण्यासाठी मुहूर्त पाहणाऱ्या उमेदवारांमुळे अंधश्रद्धेला खतपाणी – अंनिसचा आक्षेप

अंधेरी पोटनिवडणुकीत नाटय़मयरीत्या घ्यावी लागलेली माघार, पदवीधर-शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांचा झालेला पराभव यामुळे महाविकास आघाडीच्या पंखांना बळ मिळू लागल्याने पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणूक भाजप आणि शिंदे गट यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे.  कसब्यात भाजपने ब्राह्मण समाजातील उमेदवार न दिल्याचे पडसाद या मतदारसंघातून उमटले आहेत. उमेदवारीच्या निर्णयावरून ब्राह्मण समाजात काही प्रमाणात नाराजी असल्याची चर्चा असताना या समाजातील विशिष्ट संस्था तसेच प्रभावी मंडळींच्या भेटीगाठी घेऊन ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

उमेदवारी अर्ज भरल्यापासून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुणे दौरा सातत्याने सुरू आहे. पक्षाशी संलग्न संस्था, संघटना, न्याती संस्थांशी संपर्क सुरू झाला आहे. मतदारसंघातील जातीय समीकरणे पाहून तशी जबाबदारी त्या-त्या नेत्यांना आणि आजी-माजी आमदारांना देण्यात आली आहे.  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड येथून कसब्यात मुक्काम हलविला आहे. त्याच्या मदतीला तैनात असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे निवडणुकीची जबाबदारी असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यासोबत प्रचारातही सहभागी होत आहेत. या निवडणुकीसाठी भाजपचे सर्व दिग्गज नेते प्रचारात येणार आहेत. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मतदारसंघातील जाळे विचारात घेऊन त्यांच्यावरही काही जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.

भाजपने एकीकडे आपली यंत्रणा ताकदीनिशी उतरवली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यामागे आपले बळ उभे केले आहे.  मुख्यमंत्र्यांनी ठाणे शहर तसेच जिल्ह्यातील भाजपमधील ब्राम्हण समाजातील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी जातीने चर्चा करून कसब्यासाठी व्यूहरचना आखत असल्याचे समजते.  कल्याण-डोंबिवलीतील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक कसब्यात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचे विश्वासू आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांना कसब्यात पाठवण्यात आले आहे. कसब्यातील राजकीय, समाजिक समाजिक संस्था, विशेषत: गणेश मंडळांचा प्रभाव, तसेच येथील इतर प्रश्नांची बारीक माहिती मुख्यमंत्री घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्यात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युतीचे नवे पर्व सुरू झाले आहे. युती धर्म पाळून भाजप उमेदवाराच्या विजयासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरायचे, असे स्पष्ट आदेश विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला दिले आहेत. यापुढील सर्व निवडणुकांमध्ये युतीतील दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून विजयासाठी मेहनत करतील. तेच चित्र सध्या कसबा आणि चिंचवड येथे दिसत आहे.

– नरेश म्हस्के, ठाण्याचे माजी महापौर

कोणतीही निवडणूक भाजपकडून गांभीर्यानेच घेतली जाते. कसबा पोटनिवडणूकही त्याला अपवाद नाही. बूथ केंद्र, शक्तीकेंद्रांपासूनचे सर्व सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. राज्यातील आणि केंद्रातील नेते प्रचार सभेत उतरणार आहेत.

– जगदीश मुळीक, शहराध्यक्ष, भाजप