लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार आणि धोकादायक पद्धतीने रिफिलिंग करणाऱ्या चौघांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली. परमेश्वर दयानंद माने ( वय २६ रा. भोसरी) याला गुन्हे शाखा युनिट दोन, तर किशोरकुमार भाकरराम मेधवाल (वय २२), रितेश सुरेश यादव (वय २१) आणि राजाराम लालाराम बिष्णोई (वय ३८, तिघे रा.पुनावळे) यांना रावेत पोलिसांनी अटक केली.

परमेश्वर माने हा भोसरी परिसरात घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपी गॅस सिलेंडरच्या मोठ्या टाकीमधील गॅस लहान टाक्यांमध्ये भरून विक्री करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. आरोपी परमेश्वर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून घरगुती गॅसच्या दहा मोठ्या टाक्या, लहान गॅसच्या २८ टाक्या अशा एकूण ३८ टाक्या, दोन गॅस विड्रॉल मशीन, एक वजनकाटा असा ४८ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. त्याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा- पुणे: अनैतिक संबंधाच्या संशयावरुन भावजयीसह दोन मुलांना जाळून मारणारा आरोपी गजाआड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गॅस विक्री आणि रिफिलिंगचा कोणताही परवाना नसताना रावेत येथे सहा लाख आठ हजार ६५६ रुपये किमतीचे व्यावसायिक गॅस टाकीमधून गॅस काढून दुसऱ्या टाकीत टाकून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या तिघांना रावेत पोलिसांनी अटक केली. आरोपी गॅस सारख्या ज्वालामुखी पदार्थाबाबत निष्काळजीपणाचे कृत्य, लोकांच्या जीवितास धोका निर्माण करत होते. रावेत पोलीस तपास करत आहेत.