पुणे : सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी जे. पी. नड्डा यांना पत्र पाठविले आहे. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस कुशल राजकीय व्यक्तिमत्व असून भाजपचे भविष्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपला सक्षम नेतृत्त्व देऊ शकणाऱ्या नेत्यांमध्ये जी काही दोन-तीन नावं आहेत, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे नाव प्राधान्यक्रमाने घ्यावे लागेल. राज्यातील सत्तांतरानंतर फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास भाग पाडण्यात आले. 

पुण्यातील ब्राह्मण महासंघ २००९ साली काँग्रेसचे सुरेश कलमाडी, २०१४ साली अनिल शिरोळे आणि २०१९ मध्ये गिरीश बापट यांच्या पाठिशी उभा राहिला. राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्त्वासाठी देवेंद्र फडणवीस सुरक्षित नेते आहेत. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ राष्ट्रहिताला प्राधान्य देतो. अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस भाजपच्या वैभवशाली नेतृत्त्वाची परंपरा कायम ठेवतील, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brahman mahasangh demand to nominate dcm devendra fadnavis to lok sabha from pune pune print news zws
First published on: 19-08-2022 at 20:54 IST