पुणे : गृहनिर्मिती प्रकल्पातील आर्थिक वादातून बांधकाम व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात घडली. बांधकाम व्यावसायिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भागीदारासह त्याच्या मुलांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

किशोर मनोहर बेट्टीगिरी (वय ५२, रा. पद्मनाभ बंगला, रायकरनगर, धायरी) असे आत्महत्या केलेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. बेट्टीगिरी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन भागीदार सुरेंद्र बाबुराव लायगुडे, संग्राम सुरेंद्र लायगुडे, सागर सुरेंद्र लायगुडे (तिघे रा. धायरी) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखळ करण्यात आला. याबाबत बेट्टीगिरी यांची पत्नी सविता (वय ४८) यांनी सिंहगड रस्ता फिर्याद दिली आहे. बेट्टीगिरी कुटुंबीय मूळचे कर्नाटकातील आहे. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, आई असा परिवार आहे. गेल्या काही वर्षांपासून ते धायरी भागात स्थायिक झाले आहे, अशी माहिती तपास अधिकारी उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी दिली.

हे ही वाचा…वारजे भागातील तोतया डाॅक्टरविरुद्ध गुन्हा, वैद्यकीय पदवी नसताना मूळव्याधीवर उपचार केंद्र

बेट्टिगिरी आणि सुरेंद्र लायगुडे यांनी भागीदारीत बांधकाम व्यवसाय सुरु केला होता. धायरीतील बारंगिणी मळा येथे राजवीर ॲव्हेन्यू गृहप्रकल्पाचे काम सुरू होते. स्वाती कन्सलटन्सीकडून संग्राम लायगुडे, त्याचा भाऊ सागर यांनी बेट्टीगिरी यांना ९१ लाख रुपये दिले होते. बेट्टीगिरी यांनी ८० लाख रुपये परत केले होते. त्यानंतर उर्वरित पैशांसाठी तगादा लावून लायगुडे यांनी गृहप्रकल्पाचे काम दाेन ते तीन वेळा बंद पाडले होते. संग्राम आणि त्याचा भाऊ सागर यांनी गृहप्रकल्पातील दोन व्यावसायिक गाळे ताब्यात घेतले होते.

हे ही वाचा…पुण्यात झिकाने पुन्हा काढले डोके वर! रुग्णसंख्येत वाढ सुरूच; रुग्णांमध्ये गर्भवतींचे प्रमाण अधिक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उर्वरित पैसे देणे जमत नसेल तर, जीव दे, अशी धमकी लायगुडे यांनी पतीला दिली. तेव्हापासून ते नैराश्यात होते. त्यानंतर बेट्टीगिरी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, असे बेट्टीगिरी यांची पत्नी सविता यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. बेट्टीगिरी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली असून, उपनिरीक्षक श्रीकांत सावंत तपास करत आहेत.