पुणे : भविष्यातील वाहने, इंधन आणि तंत्रज्ञान याचा वेध पहिल्या ‘नेक्स्टजेन मोबिलिटी शो’मधून घेण्यात आला. त्यात पर्यायी इंधनावर चालणाऱ्या मोटारींसह इतर आधुनिक वाहतूक सुविधांची मांडणी करण्यात आली. या प्रदर्शनाच्या माध्यमातून वाहन उद्योगातील बदलते तंत्रज्ञान आणि हरित इंधन पर्याय यावर भर देण्यात आला आहे.

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या (सीआयआय) वतीने आयोजित या प्रदर्शनाचे उद्धाटन पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, टाटा ऑटोकॉम्प्स सिस्टीम्सचे अध्यक्ष अरविंद गोयल, पिनॅकल इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुधीर मेहता यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी झाले. डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाच्या मैदानावर उद्याही (ता. १६) हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.

हेही वाचा : एनडीए रस्त्यावर कोयता गँगची दहशत; उपहारगृहातील कामगारांना मारहाण

या प्रदर्शनात शंभरहून अधिक प्रदर्शक सहभागी झाले आहेत. प्रदर्शनात इलेक्ट्रिक वाहने, भविष्यातील हरित इंधन तंत्रज्ञान, वाहनांची रचना आणि शहरी गतिशीलता या क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यात अनेक कंपन्यांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचे सादरीकरण करण्यात आले. प्रदर्शनात आयोजित चर्चासत्रात उद्योग क्षेत्रातील नेतृत्वाने पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या निर्मितीत भारत सर्वांत मोठी बाजारपेठ बनेल, असा सूर व्यक्त केला.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये पाणी कपात? व्हायरल मॅसेज खरा की खोटा…?

“सध्या पीएमपीएमपीएलच्या ६७ टक्के बस सीएनजीवर चालत असून, २३ टक्के इलेक्ट्रिक बस आहेत. उरलेल्या केवळ १० टक्के डिझेलवर चालणाऱ्या बस आहेत. आगामी काळात टप्प्याटप्प्याने डिझेल बस वापरातून बंद करण्यात येतील. प्रवाशांसाठी शाश्वत आणि भरवशाची वाहतूक सुविधा निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.” – संजय कोलते, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे स्मार्ट सिटी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हायड्रोजन मोटारीचा नमुनाही सादर

यवतमाळस्थित एआयकार्स या कंपनीने हायड्रोजनवर चालणाऱ्या मोटारीचा नमुना प्रदर्शनात सादर केला. जीवाश्म इंधनाऐवजी हायड्रोजनवर चालणारी मोटार कंपनीने विकसित केली आहे. याचबरोबर या मोटारीत कृत्रिम वापर करण्यात आला आहे.