पुणे : पद्मावती परिसरातील विणकर सभागृहाजवळ मोटारीने अचानक पेट घेतल्याची घटना रविवारी दुपारी घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.
विणकर सभागृहाजवळ रस्त्याच्या कडेला लावलेल्या एका मोटारीने पेट घेतल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी फोमचा वापर करून आग आटोक्यात आणली.
हेही वाचा…पाऊस वाढल्याने फळभाज्या, पालेभाज्या स्वस्त… दर काय?
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
मोटारीत कोणी नव्हते. त्यामुळे गंभीर दुर्घटना टळली. अग्निशमन दलाचे अधिकारी प्रदीप खेडेकर, गणेश भंडारे, जवान पंकज इंगवले, निलेश राजीवडे, अभिषेक खाटपे, योगेश कुंभार, विनायक घागरे यांनी आग आटेक्यात आणली.