पुणे: केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांची प्रतिमा मलीन करण्याच्या दृष्टीने वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांच्याविरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश अरुण शिंगटे (रा.निगडी,पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा >>> पुणे जिल्ह्याची रणनीती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ठरवणार; विकासकामांचा दरमहा आढावा

 लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय, सिंधुदुर्ग, कुडाळ याठिकाणी  शिवसेना पक्षाचे आमदार वैभव नाईक यांच्याविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असलेल्या चौकशीच्या निषेधासाठी मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे व आमदार नितेश राणे यांची प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने अर्वाच्छ भाषेत वक्तव्य करुन उपहासात्मक उल्लेख केला. त्यामुळे सामाजिक भावना दुखावल्या असून सामाजिक, भावनिक तेढ निर्माण करुन त्यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. जाधव यांनी केंद्रीय मंत्र्याच्या  पदाचा अपमान करुन जनमानसात बदनामी केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक एस.कांबळे तपास करत आहे.

हेही वाचा >>> पिंपरी: खोदलेल्या रस्त्यांनी घेतला दोन वर्षांच्या बालकाचा बळी; कासारवाडीतील घटना, पालिकेचे दुर्लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार भास्कर जाधव यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

– मुरलीधर करपे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डेक्कन पोलीस ठाणे</p>