लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पहिला विवाह झाल्याचे लपवून ठेवत दुसरा विवाह करून महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एका डॉक्टरसह त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तक्रारदार महिलेने याबाबत तिच्या वकिलांमार्फत मुंबई उच्च न्यायालयात खासगी फौजदारी तक्रार दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशाने याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत एका महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, डॉक्टरसह त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉक्टरचा पहिला विवाह झाला होता. त्याचे पत्नीबरोबर पटत नसल्याने दोघे वेगळे राहत होते. घटस्फोट ‌झालेला नसताना डॉक्टरने फिर्यादी महिलेशी डिसेंबर २०१६ मध्ये दुसरा विवाह केला. त्यानंतर डॉक्टर आणि त्याच्या कुटुंबीयांनी महिलेचा छळ सुरू केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोटार खरेदीसाठी महिलेकडून तीन लाख रुपये घेण्यात आले. नवीन घर घेण्यासाठी माहेरहून ५० लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात आली. ‘तुझा माझ्याशी कायदेशीर विवाह झाला नाही. माझा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट ‌झाला नाही,’ असे डॉक्टर पतीने महिलेला सांगिलते. त्यानंतर तिला धक्का बसला. तिने तिचे वकील ॲड. सत्या मुळे यांच्यामार्फत उच्च न्यायालायत तक्रार दिली. न्यायालायच्या आदेशाने पोलिसांनी याप्रकरणी डॉक्टरसह त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल केला.