पुणे : जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे जिल्हा सदस्य उपायुक्त नितीन चंद्रकांत ढगे यांना १ लाख ९० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. तर आरोपी अधिकाऱ्याच्या घराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी झाडाझडती घेतली असता तर घरी १ कोटी २८ लाख ४९ हजार रूपयांची रोख रक्कम आढळून आली. एकूण कागदपत्रांसह २ कोटी ८१ लाख ८९ हजार रूपयांची मालमत्ता आढळून आली आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍याकडून देण्यात आली आहे.

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त नितीन चंद्रकांत ढगे (वय ४०), असे आरोपी अधिकाऱ्याच नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्तीच्या पत्नीचे जात प्रमाणपत्र पडताळणी वैद्य करण्या करिता वानवडी भागात राहणारे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे जिल्हा सदस्य उपायुक्त नितीन चंद्रकांत ढगे यांनी तक्रारदाराकडे ८ लाख रूपयांची मागणी केली. त्यावर तडजोडी अंती २ लाख देण्याचे ठरले. त्यानुसार काल रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी वानवडी येथील नितीन चंद्रकांत ढगे यांच्या घराजवळ  तक्रारदारा १ लाख ९० हजार रुपये देण्यास गेला. 

Security guards have fake police character verification certificates
पिंपरी : धक्कादायक! सुरक्षारक्षकांकडे बनावट पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रे
400 lakh crore market cap milestone of Mumbai Stock Exchange
विश्लेषण : ७५ हजारांचे शिखर… ४०० लाख कोटींचे बाजारभांडवल… शेअर बाजार आणखी किती तेजी दाखवणार?
Even before the arrival of Padwa festival the price of gold is over 72 thousand
पाडव्याआधीच सोने ७२ हजारांपुढे!
5 Crore and 45 lakh embezzlement in Nandura Urban Bank
नांदुरा अर्बन बँकेत साडेपाच कोटींचा अपहार, कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन…

तेव्हा तक्रारीनुसार अगोदर परिसरात सापळा रचण्यात आला होता.  तक्रारदार हा आरोपी ढगे यांना पैसे देताच क्षणी रंगेहाथ पकडण्यात यश आले. त्यानंतर आरोपीच्या घराची झाडाझडती घेतली असता. त्यावेळी १ कोटी २८ लाख ४९ हजार रूपयांची रोख रक्कम आढळून आली. तर इतर मालमत्ता कागदपत्र असे मिळून २ कोटी ८१ लाख ८९ हजार रूपयांची मालमत्ता मिळून आली असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले आहे. तसेच आरोपी अधिकारी ढगेकडे अधिक चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.