पिंपरी- चिंचवड : बांधकाम साईटवर सिमेंट मिक्सर पलटी झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने घटनेत कुणीही जखमी नाही. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. रावेत येथील बांधकाम साईटवर हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे. सिमेंट मिक्सर पलटला सुदैवाने चालक सुरक्षित बाहेर पडला.
सविस्तर माहीती अशी की, रावेत येथील बांधकाम साईडवर सिमेंट मिक्सर पलटी झाला आहे. सुदैवाने यात जीविहितहानी झालेली नाही. घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. तिथं उपस्थित असलेल्या व्यक्तीने हा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. सिमेंट मिक्सर पलटी होऊ शकतो, हे लक्षात आल्याने त्या व्यक्तीने मोबाईल सुरू केला. सिमेंट मिक्सरचे चाक घसरले आणि काही कळायच्या आत उजव्या बाजूला पलटी झाला. सुदैवाने चालक सुखरूप आहे. घटनेचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.