पुणे : घर फोडल्यामुळे भाजपला निवडणुकीत पराभवाला सामोरे जावं लागलं आहे असं विधान काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं. त्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची घर फोडण्याची मोठी परंपरा आहे त्यावर लवकरच पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार आहे. सत्ता आल्यानंतर त्याचा दुरुपयोग कोणी केला, विश्वास घात कोणी केला.

हेही वाचा >>> कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवर चंद्रकांत पाटील यांचं सूचक विधान; म्हणाले, “आज…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धवजींची शिवसेना रोज उठून गद्दारी केली म्हणत आहेत. तुम्ही २०१९ ला काय केले. तुम्ही गद्दारीच केली ना, राष्ट्रवादी म्हणत आहे. यांनी यांची माणसं पळवली. पण तुम्ही आमच्या उद्धवजींना पळवलं. आमचं अतिशय गुण्यागोविंदाने चाललं होतं. तुम्ही त्यांना फितवलं, पळवलं, अशा शब्दात नाना पटोले यांना त्यांनी टोला लगावला. तसेच ते पुढे म्हणाले की, आम्ही सर्वजण सहनशील आहोत म्हणजे भित्रे नाही. घर कोणी कोणाची फोडली, गद्दारी कोणी केली, पाठीत खंजीर कोणी खुपसला. यावर वेगळी पत्रकार परिषद घेण्याची इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं.