संजय राऊत ज्यांना गुरू समजतात, त्या शरद पवार यांचा इतिहासच खंजीर खुपसण्याचा आहे, अशा शब्दात जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती.
हेही वाचा >>>पुणे: पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा १२ फेब्रुवारीला; अर्जांसाठी १६ डिसेंबरची मुदत
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकापुढे हात जोडालया जाणार असेल तर हातातील खंजीर बाजूला ठेवा, अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली होती. यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिले.संजय राऊत ज्यांना गुरू मानतात, त्या शरद पवार यांचा इतिहास खंजीर खुपसण्याचाच आहे. शिंदे गटाच्या खंजिराला वेगळी पार्श्वभूमी आहे. ठाकरे गटाला हिंदुत्वाचा विसर पडल्याने आणि तो असह्य झाल्याने शिंदे गटाकडून उठाव करण्यात आला. हा त्यांच्या आपापसातील विषय आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.