"काम नाही, धाम नाही, घरी जा बायको..." मंत्री चंद्रकांत पाटलांनी पत्रकाराला हुसकावलं, VIDEO व्हायरल | chandrakant patil get angry on journalist in pune viral video rmm 97 | Loksatta

“काम नाही, धाम नाही, घरी जा बायको…” मंत्री चंद्रकांत पाटलांनी पत्रकाराला हुसकावलं, VIDEO व्हायरल

पुण्यातील जिल्हा परिषदेच्या बैठकीनंतर प्रतिक्रिया घेण्यासाठी आलेल्या एका पत्रकाराला चंद्रकांत पाटलांनी हुसकावलं आहे.

“काम नाही, धाम नाही, घरी जा बायको…” मंत्री चंद्रकांत पाटलांनी पत्रकाराला हुसकावलं, VIDEO व्हायरल

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज पुणे दौऱ्यावर आले होते. पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी आज पहिल्यांदाच पुणे जिल्हा परिषदेची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर प्रतिक्रिया घेण्यासाठी आलेल्या एका पत्रकाराला चंद्रकांत पाटलांनी हुसकावल्याचं दिसत आहेत. संबंधित घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

पुण्यातील बैठकीनंतर चंद्रकांत पाटील आपल्या वाहनात बसत होते. यावेळी एक पत्रकार त्यांच्याकडे प्रतिक्रिया घेण्यासाठी आला. संबंधित बैठकीत काय चर्चा झाली? याबाबत विचारलं असता, चंद्रकांत पाटलांनी पत्रकाराला हुसकावून लावलं. “काम नाही, धाम नाही, घरी जा…तुझी बायको वाट पाहतेय” असं चंद्रकांत पाटील म्हटल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

पालकमंत्री झाल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी पहिल्यांदाच पुणे जिल्हा परिषदेची आढावा बैठक घेतली. जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्र शासनाच्या तसंच राज्य शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा प्रत्येक महिन्यात घेण्यात यावा. तसेच जिल्हा परिषदेने सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रस्थानी ठेऊन विश्वस्ताच्या भूमिकेतून विकासाभिमुख कामे करावीत, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

दरम्यान, जिल्हा परिषदेत उभारलेल्या विकास योजना निरीक्षण कक्षाचं उद्घाटनही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. या कक्षामार्फत जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विकास योजनांच्या आर्थिक, भौतिक प्रगतीचा आढावा घेण्यासह संगणकीय पद्धतीने नियंत्रण केले जाणार आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
‘टीईटी’बाबत दिरंगाई झाल्यास आता अधिकाऱ्यांवर कारवाई; प्राथमिक शिक्षण संचालकांचा उपसंचालकांना इशारा

संबंधित बातम्या

अमरावतीत न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडे ‘सेक्स’ची मागणी, रुपाली चाकणकर म्हणाल्या, “विद्यार्थीनीचं…”
‘फुले-आंबेडकर आणि कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली’ या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण, म्हणाले…
VIDEO: बाळासाहेब ठाकरे जीवंत असताना २८८ पैकी १०० जागांपर्यंत पोहचू शकले नाहीत – संजय गायकवाड
मनसे नेते वसंत मोरे राष्ट्रवादीत जाणार? अमित ठाकरे भेटीनंतर स्पष्ट केली भूमिका, म्हणाले “इतर पक्षात जर…”
“छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जरी घेतले तरी…”; शिवरायांबद्दल बोलताना अमोल कोल्हेंचा माईक बंद केल्याने NCP चा हल्लाबोल

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“कर्नाटक सरकार अतिरेकी भूमिका घेत असून…” सीमावादावर दिलीप वळसे-पाटलांचं विधान
VIDEO: अमरावतीत न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडे ‘सेक्स’ची मागणी, रुपाली चाकणकर म्हणाल्या, “विद्यार्थीनीचं…”
‘सिर्फ तुम’ चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकणारी प्रिया गिल सध्या काय करते? जाणून घ्या कुठे आहे अभिनेत्री
“बालिश विकृत लोकांसाठी…” मेघा घाडगेची ‘ती’ पोस्ट चर्चेत
विश्लेषण: सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ३० टक्के आरक्षण; उत्तराखंड सरकारकडून विधेयक मंजूर, काय आहेत तरतूदी?