पिंपरी- चिंचवड : राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी महत्वाचं विधान केले आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. “कुठल्याही निष्कर्षावर पोहचणे बरोबर नाही. पार्थ पवार एकटे कसे अजित पवारांचा यात सहभागी असेल. हे सर्व काही तपासांती समोर येईल.”अस चंद्रकांत पाटील यांनी अधोरेखित केले आहे.

पुण्यातील बहुचर्चित जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवार यांच नाव घेतलं जातं आहे. परंतु, अद्याप त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही. कोंढवा येथील ४० एकर जमीन कवडीमोल भावात पार्थ पवार यांची भागीदारी असलेल्या अमेडिया कंपनीने घेतली आहे. यावरून आता राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मत व्यक केलं आहे. ते म्हणाले, “राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुठलाच भ्रष्ट्राचार सहन करत नाहीत. या प्रकरणात तात्काळ तहसीलदार यांना निलंबित केलं आहे.

आय.जी दर्जाचे अधिकाऱ्याची याप्रकरणी चौकशीसाठी नेमले आहे. त्यामुळं आताच पार्थ पवार यांचा आणि त्यांच्या कंपनीचा सहभाग आहे, किंवा पार्थ पवार एकटेच कसे अजित पवारांचा सहभाग असेल. या निष्कर्षावर येणं बरोबर नाही. चौकशीअंती सगळं समोर येईल. याचा आणि महानगर पालिकेचा काहीही संबंध नाही. अस स्पष्टपणे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.