पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनीशा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रतिक्रिया दिली आहे.

हलगर्जीपणा करणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर शंभर टक्के कारवाई केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. रुग्णालयात एक प्रकारची मुजोरी सुरू आहे. ही मुघलशाही आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी दखल घेतली आहे. गर्भवती तनीषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात कुणालाही सोडलं जाणार नाही. अस स्पष्ट मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, रुग्णालयाकडून मोठी चूक झाली आहे. अशा चुकीला माफी नाही. सरकार यावर योग्य कारवाई करणार आहे. सर्वसामान्य माणसाला अशा पद्धतीने उपचार न देणे ही एक प्रकारची मुजोरी आहे. ही मुघलशाही आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी दखल घेतलेली आहे. आम्ही कुणालाही सोडणार नाहीत. कठोर कारवाई करणार आहोत. घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे.

पुढे ते म्हणाले, जिल्ह्याधिकारी यांच्याशी बोललो आहे. रुग्णालयाला अनेक सोयी सुविधा दिल्या आहेत. आणखी एक जागा पार्किंगसाठी दिली आहे. परंतु, डॉक्टर आणि कर्मचारी अशी मुघलशाही करत असतील तर आम्ही मान्य करणार नाही. शक्य असेल तर गुन्हे दाखल करू. असं आश्वासन देतो अस ही त्यांनी अधोरेखित केले आहे.

मंत्री आशिष शेलार आणि काँग्रेस चे विजय वडवट्टीवर यांच्या भेटीवर म्हणाले, महाराष्ट्राची संस्कृती आहे. विरोधी आणि सत्ताधारी एकत्र भेटत. इतर राज्यासारख नाही. अनेकदा मला ही विजय वडवट्टीवार भेटले आहेत. आशिष शेलार यांना कामानिमित्त भेटले असतील. पुढे ते म्हणाले, ते पक्षांतर्गत बोलले नाहीत. पक्ष सोडणार आहे, मला पक्षात यायचं आहे. अस बोलले नाहीत. त्यांनी काँग्रेस च काम करण्याची भूमिका घेतलेली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ते म्हणाले, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई करण्यासाठी मर्यादा नाही. मंगेशकर परिवारावर थोडीच कारवाई आहे. चूक करणाऱ्यांवर कारवाई करत आहोत. ते कशाला आडवे येतील. असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. पुढे ते म्हणाले, मनसेच्या आंदोलनकर्त्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करू नये. चुकलं असेल तर त्यांना काढता येतं, कारवाई करता येते. त्यांनी हातात कायदा घेऊन नये. पुढे ते म्हणाले, संजय राऊत यांना मोदींच्या नावाचा, भाजपच्या नावाचा, देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा पंडू रोग झाला आहे. पंडु रोग म्हणजे माणसाचं स्वास्थ्य खराब करत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसतात. असा खोचक टोला संजय राऊत यांना लगावला आहे.