राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमुळे पुणेकरांवर कराचे ओझे लादले गेले असून, या संदर्भात लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुणेकरांना दिलासा देऊ अशी ग्वाही भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली.

मुळीक म्हणाले, ‘‘महापालिकेकडून ४० टक्के सवलतीचा ठराव रद्द करणे तसेच पूर्वलक्षी दराने कर वसूल करू नये यासाठी महापालिकेकडून अनेकदा ठराव पाठविण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकारने या ठरावा कडे दुर्लक्ष केले. ४० टक्के सवलत रद्द करणे आणि त्याची फरकाची रक्कम वसूल करणे हे अन्यायकारक आहे.’’

Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
flamingo, Solar lights, Navi Mumbai ,
फ्लेमिंगो क्षेत्रात सौरदिवे! पर्यावरणवाद्यांच्या तक्रारींनंतर नवी मुंबई महापालिकेची धावाधाव
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी

हेही वाचा : पुणे : ससून रूग्णालयात रूग्णांसह कर्मचाऱ्यांची फसवणूक ; ’सीएमओ’मधून बोलत असल्याची बतावणी

महाविकास आघाडी सरकारने ही सवलत रद्द केली आहे. महापालिकेने सवलत रद्द झालेली रक्कम तातडीने वसूल करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देऊन पुणेकरांना दिलासा देण्यासाठी लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची पुणे शहर भाजपच्या वतीने भेट घेण्यात येणार आहे, असे मुळीक यांनी सांगितले.