पुणे : आषाढी पालखी सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन घेतले. मंदिरात त्यांच्या हस्ते पालखीची पूजा झाली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे मी दर्शन घेतले आहे. याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे. तसेच आपल्या सर्वाना माहिती आहे की, या पालखी सोहोळ्यात वारकरी आणि नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. त्यामुळे आपल्या संस्कृतीच आणि भागवत धर्मांचे दर्शन एक प्रकारे पाहण्यास मिळते, त्याच बरोबर हे दर्शन घेऊन मी तृप्त झालो असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, गुरु शांतिनाथ, राजेंद्र उमाप,भावार्थ देखणे, पुरुषोत्तम पाटील, रोहिणीताई पवार,चैतन्य लोंढे, पालखी विठ्ठल मंदिर संस्थांचे अध्यक्ष तेजेंद्र कोंढरे, विश्वस्त प्रमोद बेंगरूट, शिवाजीराव जगदाळे, गोरख भिकुले आदी उपस्थित होते.