पुणे : मोटारीतून येऊन सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून पळून जाणाऱ्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या भरारी पथकाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच मोकळ्या जागांवर कचरा टाकणाऱ्यांचे पत्ते शोधूनही त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला.स्वच्छ भारत अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाकडून सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयस्तरावर भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार साम्राज्य पूरम सोसायटी आणि डहाणूकर काॅलनी विकास मंडळ यांना सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळल्याप्रकरणी दंड करण्यात आला आहे. या दोघांकडून एकूण दहा हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत.

भरारी पथकातील मुकादम वैजीनाथ गायकवाड गस्त घालत असताना मोटारीतून आलेल्या नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे गायकवाड यांनी दोन मोटारींचा पाठलाग करून त्यांच्याकडून प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड वसूल केला.सार्वजनिक ठिकाणी टाकण्यात आलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधत चार नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या नागिरकांकडून प्रत्येकी पाचशे रुपये या प्रमाणे पाच हजार रुपये वसूल करण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Collecting fines from municipal officials by finding addresses from garbage thrown on the streets pune print news apk 13 amy
First published on: 01-03-2024 at 22:11 IST