पुणे : महाविद्यालयीन युवकाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील रोकड लुटून नेण्यात आल्याची घटना लष्कर भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत एका युवकाने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार युवक लष्कर भागातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तो सोमवारी (३ फेब्रुवारी) सकाळी पावणेसहाच्या सुमारास पूना काॅलेज परिसरातून दुचाकीवरुन निघाला होता. पूना काॅलेज परिसरातील रस्त्यावर दोन चोरट्यांनी त्याला अडविले. त्याला चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. युवकाला मारहाण करुन खिशातील १२०० रुपयांची रोकड लुटून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक राहुल घाडगे तपास करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पानपट्टी चालकाला लुटणारा सराइत अटकेत

पुणे रेल्वे स्थानक परिसरात पानपट्टी चालकाला कोयत्याचा धाक दाखवून गल्ल्यातील पाच हजारांची रोकड लुटणाऱ्या सराइताला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. आनस खान (वय २४, रा. चुडामण तालीम, भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत जुनैद निहाल खान (वय २४, रा. साईबाबानगर, कोंढवा) याने फिर्याद दिली आहे. जुनैद याची पुणे रेल्वे स्थानक परिसरात पानपट्टी आहे. सोमवारी सकाळी आरोपी आनस पानपट्टीत आला. त्याने कोयत्याचा धाक दाखवून जुनैदला जिवे मारण्याची धमकी दिली. गल्ल्यातील पाच हजारांची रोकड लुटली. शेजारी असलेल्या एका टपरी चालकाला धमकावून त्याच्याकडे पैसे मागितले. त्याने एका मोटारीची काच फोडून परिसरात दहशत माजविली. पोलीस उपनिरीक्षक संदीप खेडकर तपास करत आहेत.