पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिरूरचे दिवंगत माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या कुटुंबियांचे पत्राद्वारे सांत्वन केले आहे. शिरूर मतदार संघाचे दोनदा नेतृत्व केलेल्या पाचर्णे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्याबाबतचे वृत्त समजल्यानंतर मोदी यांनी पाचर्णे यांच्या पत्नी मालती यांना पत्र पाठवून बाबुराव पाचर्णे यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा >>> दृश्यकलेतील अनुभव इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी लेखन ; अरुण खोपकर यांची भावना  

बाबुराव पाचर्णे यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अतीव दु:ख झाले. पाचर्णे यांना समाजसेवेची अखंड तळमळ होती. त्यांच्या सार्वजनिक जीवनात ते सदैव समाजहितासाठी वचनबद्ध राहिले. लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि सामान्य माणसाच्या दैनंदिन समस्या सोडविणे, हे त्यांचे गुण महाराष्ट्रातील लोक नेहमीच स्मरणात ठेवतील, असे मोदी यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा >>> खडकीत जुगार अड्ड्यावर छापा ; दहा जणांच्या विरोधात गुन्हा; ५० हजारांचा मुद्देमाल जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाचर्णे यांच्या निधनानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे, रासपचे नेते माजी मंत्री महादेव जानकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते पाशा पटेल, माजी मंत्री बाळा भेगडे, शिवाजीराव कर्डिले, विजय शिवतारे, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह विविध पक्षाचे आजी-माजी आमदार यांनी पाचर्णे यांच्या निवासस्थानी येऊन परिवाराचे सांत्वन केले. दरम्यान, पाचर्णे हे आजारी असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाचर्णे यांची शिरूर येथे दवाखान्यात भेट घेतली होती.