महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये तातडीन पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि गावातील प्रश्न मार्गी लावावेत, अशी सूचना पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांना केली.आमदार संजय जगताप यांनी आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. त्यावेळी समाविष्ट गावांतील समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.

हेही वाचा >>>साखर कारखान्यांना केंद्राचे आर्थिक बळ ; इथेनॉलच्या खरेदी दरात सरासरी दोन रुपयांनी वाढ

महापालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.गावांमध्ये सुरळीत पाणीपुरवठा करणे, रस्ते, पथदिवे, सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापन करावे, अशी मागणी जगताप यांनी केली. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत समाविष्ट गावांमध्ये तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित खातेप्रमुखांना दिले.

हेही वाचा >>>८१ व्या वर्षांत ८१ किल्ले ! ; पुण्यातील अरविंद दीक्षित यांच्या जिद्दीची कहाणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिका हद्दीमध्ये ऑक्टोबर २०१७ मध्ये अकरा गावांचा आणि त्यानंतर गेल्या वर्षी जुलै महिन्यात २३ गावांचा अशा एकूण चौतीस गावांचा समावेश झाला आहे. शहराच्या हद्दीत आल्यानंतरही या गावात अनेक समस्या असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे सातत्याने बैठका होत आहेत.