लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: सोसायटीच्या निवडणुकीत झालेल्या वादातून सभासदांना ई-मेल करुन महिलेची बदनामी केल्याची घटना घडली. जाब विचारणाऱ्या पतीला मारहाण केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

आणखी वाचा-Monsoon Update: विदर्भ, मराठावाडा, मध्य महाराष्ट्राला ‘यलो ॲलर्ट’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी शेखर बाबुलाल धोत्रे ( रा. कडनगर, उंड्री) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला आणि आरोपी धोत्रे एकाच सोसायटीत राहायला आहेत. सोसायटीच्या निवडणुकीत त्यांच्यात वाद झाले होते. त्यानंतर धोत्रे याने सोसायटीतील १४० सभासदांना महिलेविषयी बदनानीकारक मजूकर इमेलद्वारे पाठविला होता. महिलेच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यानंतर महिलेच्या पतीने आरोपी धोत्रेला जाब विचारला. तेव्हा त्याने पतीला मारहाण केली. पोलिसांकडे तक्रार केल्यास मी बघून घेतो, अशी धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.