उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

बारामती : बारामती शहरासह तालुक्यात करोना संसर्गाचा दर पाच टक्क्यांच्या पुढे गेल्यास नाईलाजाने पुन्हा कडक निर्बंध लावावे लागतील. त्यामुळे सर्वानीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिले.

बारामती परिसरातील विकासकामांच्या पहाणी दौऱ्यानंतर विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात करोना विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा पवार यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

तालुक्यात सुरू असलेली विकासकामे दर्जेदार करण्याबरोबरच सर्व विभागांनी समन्वय राखत कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश पवार यांनी दिले.