लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या सुरक्षारक्षकाविरुद्ध खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आशिष रावत (वय ४९, सध्या रा. क्रिमसन सोसायटी, पड्याळ वस्ती, ओैंध रस्ता, खडकी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मुलीच्या आजीने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

आणखी वाचा-Ladki Bahin Yojana : पुणे जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येणार? अजित पवार यांनी थेटच सांगितले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तक्रारदार महिलेची नऊ वर्षांची नात बुधवारी (१४ ऑगस्ट) सकाळी साडेसहाच्या सुमारास शाळेत निघाली होती. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसची वाट ती पाहत थांबली होती. त्यावेळी सोसायटीतील सुरक्षारक्षक रावतने शाळकरी मुलीला त्याच्या घरात नेले. तिच्याशी त्याने अश्लील कृत्य केले. घाबरलेल्या मुलीने याबाबतची माहिती आजीला दिली. त्यानंतर रावतविरुद्ध विनयभंग, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंध कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक दिघे तपास करत आहेत.