शेजारच्या घरी पाळणा हलायला लागला की राष्ट्रवादीवाले पेढे वाटतात असा टोला रयत क्रांती संघटनेचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे. सदाभाऊ खोत यांनी पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या बैलगाडा शर्यतीला हजेरी लावली होती. तेव्हा त्यांनी बैलगाडा शर्यतीच्या श्रेय वादावरून राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेच बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली होती असा हल्लाबोल देखील सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

राष्ट्रवादी पक्ष असा आहे की, शेजारच्या घरी पाळणा हलायला लागला की ते पेढे वाटायला लागतात. राष्ट्रवादी, काँग्रेसने २०१४ साली बैलगाडा शर्यतीवरील बंदी आणली. त्यावरील बंदी उठवण्याचा पहिला अध्यादेश माजी मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काढला. विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी विधयक आणलं होतं. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याबाबत निर्णय घेतला. उच्च न्यायालयात शेतकऱ्यांची बाजू देवेंद्र फडणवीस, आमदार महेश लांडगे यांनी मांडली. त्यांनी नेमलेल्या समितीचा रिपोर्ट ग्राह्य धरला आणि बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठले, असे सदाभाऊ खोत म्हणाले.

ऊसाला लागला कोल्हा ही म्हण आहे, ऊस आला की तिथे कोल्हा खायला जातो. बैलगाडा शर्यतीवरील बंदी कुणाच्या काळात आणली हे स्पष्ट करावं, असं आव्हानही विरोधकांना सदाभाऊ खोत यांनी दिलं.

दरम्यान, या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हेही उपस्थित होते. त्यांनी बैलगाडा शर्यतीवरील बंदीवरुन विरोधकांवर निशाणा साधला. बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्राची परंपरा आहे. यावर अनेक लॉबीमूळे बंदी आली होती. मी पर्यावरण मंत्री झाल्यावर अध्यादेश काढून बैलगाडा सुरू करण्याची परवानगी दिली. याच कारण, मी खेड्यातून आलेलो आहे. शेतकरी बैलाची निगा किती राखतात. त्याला व्यवस्थित सांभाळतात. त्यामुळं आम्ही ठरवलं की बैलगाडा उत्सव साजरा करता आला पाहिजे. त्याच्यावर बंदी आणता कामा नयेत. आम्ही केलेल्या नियमावलीमुळेच सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतील परवानगी दिली, असे प्रकाश जावडेकर म्हणाले.

संभाजीराजे छत्रपती यांचा शिवसेनेने अपमान केला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सातारा, कोल्हापूरच्या गादीचा आम्ही सन्मान करतो. ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत. त्यांचा अपमान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने स्थापन झालेल्या शिवसेनेने केला याचं दुःख महाराष्ट्रातील जनतेला आहे,” असे सदाभाऊ खोत म्हणाले.