लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर चित्रपट अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात प्राप्त झालेल्या तक्रार अर्जांबाबत कायदेशीर पडताळणी करण्यात येत असून त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी दिली.

सोलापूरकर यांनी एका मुलाखतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेच्या घटनेबाबत वक्तव्य केले होते. त्यातील काही आक्षेपार्ह वक्तव्याचा भाग गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमात मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत अनेक संस्था संघटनांनी निदर्शने केली तसेच पोलिस अधिकाऱ्यांना कारवाईसाठी निवेदनही दिली आहेत. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. दरम्यान सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात तक्रारी आलेल्या आहेत. या सर्व गोष्टीची कायदेशीर पडताळणी केली जाईल. त्यानंतर याबाबतची प्रक्रिया केली जाईल, असे अमितेश कुमार यांनी सांगितले.