पुणे : खाद्यपदार्थ घरपोच देणाऱ्या डिलिव्हरी बाॅयला कोयत्याच्या धाकाने लुटण्यात आल्याची घटना हडपसर परिसरात घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत निलेश पंडित गायकवाड (वय ३१, रा. स्वागत हाॅटेलसमोर, मांजरी बुद्रुक) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी करण, विशाल्या, मुज्ज्या, शुभ्या नावाच्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – पुणे : हिंजवडीत महिलेची गोळ्या झाडून हत्या; संशयित आरोपी ताब्यात, प्रियकर की पती-पत्नी? पोलीस घेत आहेत शोध

हेही वाचा – पुणे : ऑनलाइन टास्कमध्ये १५० रुपये कमावले; अन् गमावले साडेसतरा लाख

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश झोमॅटो कंपनीत डिलिव्हरी बाॅय आहे. या कंपनीकडून घरपोहोच खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यात येतात. हडपसर भागातील रामटेकडी परिसरात एका ग्राहकाला खाद्यपदार्थ देण्यासाठी निलेश गेला होता. रामटेकडीतील उर्दु शाळेजवळ अंधाऱ्या बोळात त्याला चौघांनी अडवले. त्याला कोयत्याचा धाक दाखविला. त्याच्याकडील दोन हजार रुपयांची रोकड, धनादेश पुस्तिका, तसेच अन्य साहित्य असा पाच हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून चोरटे पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक देशमुख तपास करत आहेत.