पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात गेल्या पाच दिवसांपासून कोसळणारा मुसळधार पाऊस शुक्रवारी दिवसभर कायम होता. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठा तब्बल ९६ टक्क्यांवर पोहोचला आहे. खडकवासला आणि पानशेत ही धरणे १०० टक्के भरली असल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीत रात्री आठनंतर १२ हजार ७३६ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. खडकवासला धरणसाखळीतील महत्त्वाचे आणि सर्वात मोठे वरसगाव धरण शनिवारी (१३ ऑगस्ट) पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणांच्या परिसरात असाच पाऊस सुरू राहिल्यास पाण्याच्या विसर्गात आणखी वाढ करण्याचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांमध्ये मिळून एकूण २८.२२ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ९६.८२ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गुरुवारी रात्री खडकवासला धरणातून मुठा नदीत २६ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. धरण परिसरात रात्री पावसाचे प्रमाण कमी झाल्याने रात्री अकरा वाजता पाण्याचा विसर्ग २२ हजार क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला. रात्री एक वाजता हा विसर्ग १६ हजार क्युसेक, तर पहाटे चार वाजता १३ हजार क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी रात्री आठ वाजता १२ हजार ७३६ क्युसेकने मुठा नदीत पाणी सोडण्यात आले. दिवसभरात टेमघर धरणपरिसरात ४५ मिलिमीटर, वरसगाव आणि पानशेत धरणक्षेत्रांत अनुक्रमे १८ आणि १५ मि.मी., तर खडकवासला धरणक्षेत्रात अवघ्या एक मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.

Dam stock at 23 per cent four new dams nearing completion
धरणसाठा २३ टक्क्यांवर, नव्याने चार धरणे तळ गाठण्याच्या स्थितीत; सहा धरणांत २० टक्क्यांहून कमी पाणी
three thousand families staying near waldhuni river boycotting lok sabha election, construction within river bed
कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणक्षेत्रात दिवसभरात ६१ मि.मी. पावसाची नोंद झाली. या धरणात सध्या ७.२७ टीएमसी म्हणजेच ९७.१८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. जिल्ह्यातील इतर धरणांपैकी कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, आंद्रा, वडज, डिंभे, घोड, चिल्हेवाडी, वडीवळे, कासारसाई, मुळशी, गुंजवणी, भाटघर, वीर आणि उजनी ही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. त्यामुळे या धरणांमधून कमी-अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे, असेही जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

प्रमुख धरणांमधील पाणीसाठा टीएमसी, कंसात टक्क्यांत

टेमघर ३.०९ (८३.३६), वरसगाव १२.५९ (९८.१९), पानशेत १०.५७ (९९.२७), खडकवासला १.९७ (१००), भामा आसखेड ७.६७ (१००), पवना ७.२७ (९७.१८), डिंभे ११.८१ (९४.५५), चासकमान ७.५७ (१००), गुंजवणी ३.६० (९७.५८), नीरा देवघर ११.०८ (९४.४४), भाटघर २३.१६ (९८.५३), वीर ९.४१ (१००) आणि उजनी ५३.४६ (९९.७८)