जिल्ह्यातील सन २०२१-२२ या वर्षातील १९४ अपूर्ण कामांसाठी १२ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीकडून (डीपीडीसी) जिल्हा परिषदेला देण्यात येणार आहे. या १९४ अपूर्ण कामांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, आयुर्वेदिक दवाखान्यांची देखभाल दुरुस्ती, बांधकाम, विस्तारीकरण करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : पुणे : दिल्लीतून बेपत्ता झालेल्या तीन अल्पवयीन मुली सुखरुप ; हॅाटेल व्यवस्थापक, रिक्षाचालक आणि पोलिसांची तत्परता

यापूर्वी या कामांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्या वेळी ११ कोटी ९४ लाख रुपये वर्ग करण्यात आले होते. असे एकूण २४ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त होणार आहे.

हेही वाचा : पिंपरीतील राजकीय सत्तासंघर्षात नव्या आयुक्तांनाही तारेवरची कसरत

करोनाच्या काळात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची गरज प्रकर्षाने जाणवली. त्यानंतर ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून हालचालींना वेग आला आहे. त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र बांधणे आणि विस्तारीकरणाचा देखील समावेश असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रे अधिक चांगली होण्यास मदत होणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: District planning committee give 12 68 crore from unfinished work in pune print news tmb 01
First published on: 25-08-2022 at 13:57 IST